महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीवरील बंदी उठवली, 12,528 पदे भरण्यास मंजुरी. 2023

 मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे पोलीस भरती प्रलंबित असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितलं. परंतु, आता राज्य सरकारने पोलिस भरतीला मंजुरी दिली आहे.



2019 मध्ये पहिल्या टप्प्यात 5297 रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.


ठळक मुद्दे

  • नक्षलग्रस्त भागासह 5000 पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे.
  • कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलीस भरतीची 100 टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता इतर विभागात कोणतेही नवे पद भरण्यास बंदी घालण्यात आली होती.

मुंबई : राज्य सरकारच्या भरतीवर वित्त विभागाने घातलेले निर्बंध शिथिल करत पोलीस भरतीसाठी 12528 पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबतचा शासन आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. त्यापैकी 2019 मधील 5297 रिक्त पदे पहिल्या टप्प्यात भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. कोविड-१९ महामारीमुळे राज्याच्या आर्थिक स्रोतांवर विपरित परिणाम झाला.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांमध्ये कोणतेही नवीन पद भरण्यास बंदी घालणारा आदेश ४ मे २०२० रोजी काढण्यात आला होता. आजच्या आदेशात पोलीस भरतीत गृह विभागाला बंदीतून सूट देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलीस भरतीची 100 टक्के पदे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे अर्थ विभागाने स्पष्ट केले आहे.


पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भागात भरती : मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे पोलीस भरती प्रलंबित असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सांगितलं. परंतु, आता राज्य सरकारने पोलिस भरतीला मंजुरी दिली आहे. यामुळे नक्षलग्रस्त भागासह 5000 पदांची भरती पहिल्या टप्प्यात लवकरच करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments